आई संपावर गेली तर--
आई संपावर गेली तर--
आई जर ,
संपावर गेली आमची।
काय होईल सांगता
येत नाही फजिती।
ना वेळेवर उठण
ना वेळेवर शाळा ।
कोण देईल भाजी पोळी।
आम्हाला डबा।
वडील आमचे आम्हाला
सारखे देतील आवाज।
काही सापडत नाही माझे
शोधा तुम्ही जरा घरात।
बहीण भावांची आमची
भांडणे कोण सोडवणार।
ती मला मारणार मग मी
मोठ्या मोठ्याने रडणार।
सगळी उठल्यापासून
किती कामे असतात।
ती करत राहते म्हणून सगळे
निष्काळजीपणाने वागतात।
शाळेत उशीर झाल्यावर
बाई करतील शिक्षा।
वेळ झाला म्हणून निघून
जाईल ताईची रिक्षा।
आई संपावर गेल्याचा विचार
जरी केला तर डोक होत सुन्न।
नकोरे बाबा ,आई घरातच पाहिजे.
घराच मांगल्य असते ती, तिच्यामुळे घर असते प्रसन्न।
आईसारखे दैवत साऱ्या
जगतावर नाही।
म्हणून श्री काराच्या नंतर
शिकणे अ, आ, इ।
