अनोळखी नाती🙏
अनोळखी नाती🙏
1 min
206
नाती कधी वाटते
सगळीच अनोळखी।
अनोळखी दुनियेत या
काही नाती ओळखीची।
अनोळखी शेतकऱ्याला
गंध मातीचा ओळखीचा।
पीक येत असे भरभरून
सुगंध शेतात हिरवळीचा।
अनोळखी चेहरा कधी
ओळखीचा वाटतो।
सारखे चेहरे कधी कधी
भास मनी होत असतो।
अनोळखी कधी आपली
ओळख पटवून देत असतो।
ओळखीचा कधी कधी मग
नजर चुकवून जात असतो।
