महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा
1 min
213
महाराष्ट्र आमचा
आहे आमची शान।
विविधतेने नटलेल्या
परंपरेचा मला आहे अभिमान।
कृषिप्रधान देश आमचा
येथे बळीराजाचे पूजन।
नद्या सगळ्या एकत्र येऊन
होत असतो त्यांचा संगम।
शिवबा सारखा पुत्र येथे
जिजाऊ सारखी माता।
गर्जना आमची नेहमीच असते
जय जय महाराष्ट्र माझा।
राष्ट्रगीत आमचे सुंदर
सकाळीच आम्ही शाळेत गातो।
"सत्यमेव जयते" हेच आम्ही
आमचे ब्रीद वाक्य म्हणतो।
