STORYMIRROR

SHUBHAM KESARKAR

Others

3  

SHUBHAM KESARKAR

Others

संघर्ष !!

संघर्ष !!

1 min
625

कोवळ्या ह्या मुठीत जपले

लहानपणीचे स्वप्नं सारे

तारुण्यात कधी एकदा 

स्वप्नात डोकुन पाहणे !! धृ !!


जन्म नवे , कार्य नवे

रंगमंचास आपले मानले

स्वप्नं बाळगुनी मनात सारे

गुंफूगुंफूनी ही माळ बने !! १ !!


विविध ह्या कलाकृतींचे

दर्शन एकोप्यात घडले

रंगमंच ह्या जीवनावरती

कसे निदर्शनास आणले !! २ !!


होतो बाळगूनी स्वप्नं सारे

तनमनात हे संचारले

न बघावे मागे वळूनी आता

पूर्ण प्रत्येकास करणे !! ३ !!


होते हाती सर्व काही

परंतु अडचणींवर सर्व थांबले

एका क्षणात मज वाटे आता 

की सर्व काही संपले !! ४ !!


पण हरण्याची इच्छा नव्हती 

नव्हती इच्छा ही शरणागतीची

पुढे येऊन मागे जाण्याची

नव्हती वेळ ही त्या काळाची !! ५ !!


काळ हा पुरताच जणू 

जीवन बदलूनी गेला

वयाच्या प्रत्येक क्षणी

कष्टाचे धडे शिकवीत आला !! ६ !! 


अखेर सारे सुफळ संपूर्ण झाले

होते नव्हे ते सर्व काही मिळाले

विश्वासावर उभारलेल्या ह्या स्वप्नात मी

माझे अस्तित्व निर्माण केले !! ७ !!

माझे अस्तित्व निर्माण केले !! ७ !!


Rate this content
Log in