बाल विवाह
बाल विवाह
1 min
256
लहान आहे मी अजून
थोडं मला होऊ द्या मोठं।
बालपणीच संसाराचं
माझ्यावर देऊ नका ओझं।
अनुभवांचे धडे मी
अजून शिकले नाही।
ही दुनिया आहे गोल गोल
हेच अजून मला कळले नाही।
अल्लडपणा अजून माझा
सांगा ना कुठे कमी झाला।
बालविवाहाचा विचार कसा
तुमच्या मनी हो आला।
शिकून सवरून मी
माझ्या पायावर उभी राहील।
यापेक्षा अभिमानाची दुसरी
कोणती गोष्ट तुमच्यासाठी राहील।
