भरकटलेला भारत
भरकटलेला भारत
आपल्या देशाचे भवितव्य
आपल्याच हातात आहे
देश घडवायचा की बिघडवायचा
मानवा शोधूनि पाहे
भ्रष्टाचाराच्या बातम्या
रोजच पेपरात वाचतो
दहशतवादाची भीती
मनात बाळगतो
बलात्कार नि खून तर
पाचवीलाच पुजलेले
वाटे दुर्घटनांचे
माहेरघर झालेले
रस्त्यावर थुंकणारे
जागोजागी मिळतात
कचराकुंड्या तर
शोभेलाच असतात
मतदान न केलेले
नुसताच त्रागा करतात
सरकारने काय केले
ऐटीत विचारतात
तरुणाचा देश भारत
नाही तरुणांना शिस्त
अविचारी गोष्टींमध्ये
राहतात ते मस्त
वृद्धश्रमांची वाढे संख्या
कुठे गेली संस्कृती
आधुनिकपणाच्या जगतात
का भ्रष्ट झाली मती
सांगावे ओरडून कानीकपाळी
की शांत बसावे
ठरवा आपले आपणच
काय करावे
२०२० तर उजाडले
झालो का महासत्ता
जगाच्या या शर्यतीत
कटला का आपला पत्ता
विचार करा नि ठरवा
आपण कुठे चाललो
एकमेकांशी भांडताना
सगळेच का भुललो
जागे होऊ या
बनवू या जरा डोळस
तेव्हाच ठरू महान
चढेल थोरपणाचा कळस
