दहा रु.नोट
दहा रु.नोट
1 min
177
पाहुणे आले घरी की,
मिळायची दहा रु.ची नोट।
नाचत उड्या मारत
किराणा दुकान गाठायचं थेट।
गोळ्या ,बिस्कीट, टोस, चॉकलेट
आणुन भावा बहिणींना द्यायची
तेंव्हा दहा रुपयाची नोटसुद्धा
खूप मोठी वाटायची।
पगारसुद्धा वडिलांना
खूप कमी असायचा ।
कुटुंब कस खुश ठेवता येईल
असा प्रयत्न नेहमी त्यांचा असायचा।
पैसे होते कमी पण,
आनंदी जीवन असायचं।
कमी पैशातही प्रत्येकजन
येणाऱ्या पाहुण्यांच हसतमुख स्वागत करायचं।
