वडील
वडील
वडील हळवे असले तरी,
कधी नसतात ,अश्रू डोळ्यात।
स्वतः दुःखात असले कितीही
तरी आनंदी असतात घरात।
आपले दुःख घरात कधीच
कोणाला सांगत नाही।
जबाबदारी असती त्यांच्यावर
तरी कधीच हार मानत नाही।
जबाबदारींच्या ओझ्याखाली ते
वाकलेले असतात ।
मुलाबाळांची शिक्षण ,घरखर्च
हसतमुखाने पार पाडत असतात।
त्यांच प्रेम असत खूप आपल्यावर
ते कधी आपल्याला दिसत नाही ।
कारण आईसारख टचकन पाणी
त्यांच्या डोळ्यात कधी येत नाही।
आपल्या भल्यासाठी त्यांना
कठोर व्हावच लागत।
मुलांच्या कल्याणासाठीच त्यांना
हळवं रहाणं जमत नसत।
मुले, मुली एकदा मार्गाला लागले की
ते आईपेक्षा हळवे होतात।
स्वप्न झालेले असते साकार त्यांचे,
अभिमानाने लेकरांचे गुन गातात।
प्रत्येकाचे वडील प्रत्येकासाठी
खरा अभिनेता असतो ।
कितीही मोठं संकट येऊ देत
नेहमी आपल्या बाजूने तो खंबीरपणे उभा असतो ।
