आम्ही दोन आमचे दोन
आम्ही दोन आमचे दोन
आजकाल आम्ही दोन
आमचे दोन एवढंच कुटुंब झाले।
आजोबा आजीचं प्रेम काय असत
हे सगळेच विसरून गेले।
चार जण घरात तरी
प्रत्येकाचं डोकं मोबाईल मध्ये।
गप्पा गोष्टी करायला
यांना वेळच सांगा कुठे।
संध्याकाळी असते ऊन ऊन खिचडी त्यावर साजूक तूप।
वेगळं राहायचं यांना
भारीच वाटत सुख।
सगळ्या वस्तू गोळा करता करता
दमछाक यांची होते।
एक आणले तर ,दुसरे संपते तेव्हा
यांना एकत्र कुटुंबाची आठवण येते।
एकत्र कुटुंबात कस खर्च
कळून येत नाही।
घर भरलेल असत नेहमी,
डबे कधीच रिकामे राहत नाही।
पण जबाबदारी कळण्यासाठी
जबाबदारीच ओझं उचललच पाहिजे।
आयत्या बिळात नागोबा होऊन
राहण्यापेक्षा स्वाभिमानाने जगलच पाहिजे।
सणासुदीला एकत्र येत जावं
एकमेकांना भेटत रहावं ।
आजोबा ,आजी , काका, काकू,
मायेची माणसं आपली मुलांना सारखं सांगत जावं।
