फुलांचा प्रवास
फुलांचा प्रवास
एक फुल म्हणाले ,
दुसऱ्या फुलाला,
"मैत्री ही आपली
घट्ट करतो कशाला"
काय माहीत आपला
उद्याचा प्रवास कसा।
तू जाशील एकीकडे
मी आवडेल कोणाला।
फुल थोडे नाराजच झाले,म्हणे
आपले आनंदी क्षण संपत आले।
काळजी करू नको मित्रा
मी मालकाला सांगितले।
तोडतांना आम्हाला सोबत तोडा
आमच्या मैत्रीला समजून घ्या।
एकतर आम्हाला देवाच्या चरणी
नाहीतर शुभ कार्याला न्या।
मालकाला मैत्रीचा त्यांच्या
वाटला मोठा हेवा।
दोघांना देवाच्या चरणी वाहून
कळलेच नाही निर्माल्य झाले केंव्हा।
फुलांचा प्रवास देखील
कधीतरी संपत असतो।
काट्यात असतो गुलाब
तरी नेहमी हसतमुख दिसतो।
