अनोळखी नाते
अनोळखी नाते
1 min
139
नाते होते अनोळखी आपले
हळू हळू ओळखीचे झाले।
दोन कुटुंब एकत्र येऊन,
सप्तपदीचे चालले सात पाऊले।
ऋणानुबंधाच्या रेशीमगाठी
विधात्यानेच ठरविल्या होत्या।
अनोळखी नात्याला आपल्या
विवाहबंधनात बांधल्या होत्या।
तू अनोळखी माझ्यासाठी
मीदेखील अनोळखी तुझ्यासाठी।
साथ तुझी देईल आयुष्यभर वचने
घेतली हात देऊन हातात हाती ।
