STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

देवीचे नवरात्र

देवीचे नवरात्र

1 min
146

देवी आणण्याची तयारी केली

वाजत गाजत मैदानी बसली।

रोज आरती पूजनाची तयारी

सगळेजण आनंदाने नाचली।


पातळ नेसली, साज शृंगार केला

ढोल ताश्याच्या गजर, सुगंध धुपाचा।

देवी मातेला आरतीला दिवा

गावरान तुपाचा।


सगळ्याजणी नटून थटून

दांडिया खेळे उत्साहाने।

गाणे वाजती तालावर

कशी तालात टीपरिवर टीपरी पडे।


येई उत्साहाला उधाण

आहे जरी नऊ दिवसाचे उपवास।

तहान भूक हरपून जाई

जगदंबे तुझ्या सहवासात।


दहा दिवस कसे गेले 

तुझ्या ग सेवेत आई जगदंबे।

उठल्यापासून पळापळ भक्तांची

नऊ रंग तुझे नऊ रूपे।


ठेव सुखी सगळ्यांना

आता एकच मागणे।

इच्छा कर पूर्ण सर्वांच्या

श्री आदिमाया जगदंबे।


Rate this content
Log in