श्वेत सूत
श्वेत सूत
1 min
212
नवरात्रीचे नऊ रंग
उधळती भक्तगण,
जल्लोषात खेळती
करती आराधना सारेजण...
पवित्रतेचा रंग सफेद
वाटे जणू शांतीदूत,
भरकटलेल्या मनाला
देई संयमाचे श्वेतसूत...
पौर्णिमेचा चंद्र दुधाळ
दिसे शितल प्रकाशी,
पिंजलेला शुभ्र कापूस
पिठूर चांदण्यात आकाशी...
मन असावे पांढरे स्वच्छ
ज्ञानाने व्हावे उजळ,
त्याग भावनांचे प्रतीक
एकतेचे रुप सौज्वळ...
शालिनतेचे रुप सरस्वतीचे
वाणी वरती मऊ साय
प्राजक्ताच्या फुले वाहू
चरणी नमन करते माय...
