आधुनिक महिला
आधुनिक महिला
आजची महिला आहे दमदार भारी
प्रत्येक क्षेत्रात नाव गाजवतेय ती सारी
बनून स्वतःच्या आयुष्याची ती चित्रकारी
रंगवतेय आयुष्य बनून एक स्त्री ललकारी
तिच आयुष्य असत थोडं कलाकरी
निभवावी लागते प्रत्येक भूमिका भूमीवरी
पण तरीही ती असतें स्वतः अविष्कारी
वेगवेगळ्या भूमिकेत बनवते ती स्वतःला चमत्कारी
ती आहे कुटुंबाची खरी किल्लेदारी
स्वतःला झीजवत लेकरांना बनवते वक्रकारी
तिचा विश्वास असतो तिच्या प्रत्येक कलेवरी
म्हणून यश गाठतेय ती आता वारंवारी
ती असतें तिच्या आयुष्याची खरी कास्तकारी
लढत लढत ती बनवते स्वतःला कसदारी
जरी ती नाचत असली थोडी कुटुंबाच्या तालेवरी
तरी कुटुंबाच्या सुखासाठी ती पूर्ण जगच रे वारी
अशा या देवीला देवही करतो नमस्कारी
कारण देवही असतो तिच्या त्यागाचा साक्षीदारी
महिलांच आयुष्य असतें थोडं अलगत अलवारी
खरच अशा या महिलांना माझा नमन आहे भारी.
