दुःख भांडवल
दुःख भांडवल
1 min
188
लग्न वैभव बरोबर होवून
आता सदोतीस वर्ष झाले
सुख दुःखाचा पाठशिवणी खेळ
कायमचे बाई मागे लागले...
मनाचा मनाशीच विचार चाले
अंतरी वैर सदा वाढत गेले
माझ्याच नशिबी आले ठीक आहे
बर म्हणत त्यातच रमायला लागले..
तब्येत पतीची सतत ढासळती
पण त्यातूनही वसुधा सावरते
आजारी पतीची सेवा करते
बिनधास्त जीवन सुख वेचते.....
दुःखाचे भांडवल कधीच न करते
मनाचे खेळ मनातच दाबते
पतीला जीवनभर साथ देण्याची
मनापासून पतीला वादा करते....
