STORYMIRROR

Manisha Vispute

Others

3  

Manisha Vispute

Others

निळाई

निळाई

1 min
143

नवरात्रीत रंगकला उत्सव

तिसऱ्या दिनी निळाई

सागरासम पसरली अथांग

धरतीवर साजरी गौराई...


निळसर छटा नभांगणी

स्वप्नांची दाटी नयनात

दाखवी अमर्याद भव्यता

सुखशांतीची नांदी हृदयात...


विश्वशांतीचे प्रतीक

निळा विराजमान तिरंग्यात

समानतेचा उधळू रंग

मानवता धर्म जपू देशात...


श्यामरंगी दंगली सृष्टी

विष्णुकांता मूर्ती न्यारी

शिवशक्तीची प्रचिती

नीलवर्णी महादेव भारी...


Rate this content
Log in