नारायण (कविता)
नारायण (कविता)
कोण माय माऊली ती
जीनं टाकलं उघड्यावर
बाळ तान्हं
तोची.... नारायण नारायण
गंगारामानं उचलिलं तन
अनं केलं संगोपन
पुरं केलं चौथीचं शिक्षण
तोचि.... नारायण नारायण
देवानं केलं रक्षण
काव्याचं दविलं कुरण
शब्दमागे फिरला वणवण
काव्य बनलं जीवन
तोचि.... नारायण नारायण
भारत माता होती इंग्रजांकडं गहाण
स्वातंत्र्याची लागली होती तहान
काव्यानं पेटविलं भारतीयांचं मनं
तोचि.... नारायण नारायण
नराचा झाला नारायण
मराठी भाषेनं दिलं दान
काव्यानं फुलविलं विरान माळरान
तोचि... नारायण नारायण
धन्य ती माय माऊली
जीनं दिला पुतर महान
त्याचं नाव नारायण
तोचि... नारायण नारायण