STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

रंग मनाचे

रंग मनाचे

1 min
331

अवखळ तरल, अतल मन्मना

कसे तुला मी जाणू?

शब्दकुंचल्याने तुझे रंग मी

आज पाही रंगवू   (1)


पर्जन्याने हर्षित सृष्टी 

वसुंधरा सुखावते

हिरवी झाडे- हिरव्या वेली

मन माझे मोहरते   (2)


रवि उगवता, रंग केशरी

शब्दकुंचले वर्णू किती?

उत्साहे कार्यान्वित करी

तन -मन येई फुलारुनी  (3)


नितळ खळखळ मन्मन

प्रपातापरि कोसळते

शुभ्र- धवल किती तुरे

मना- मनांमधी डोलतसे  (4)


धगधगत्या ज्वालामुखीतुनी

आगडोंब उरी दुःखाचा 

हलाहल पचवुनी मीरा

शांत गातसे भजनाला  (5)


मावळतीचे रविबिंब

सागर क्षितिजावरी

अधीर प्रेमी युगलांना

संध्यानंदाने डुलवी  (6)


शीतल चंद्रकिरणांतुनी

रजनीगंधा दरवळते

प्रीत मनीची येता फुलुनी

मधुमिलन सुखावते  (7)


रंग तुझे जळापरि

वेळ भेटता जशी जिथे

तत्क्षणी तू विरघळसी

दुग्धशर्करेपरि त्वरे   (8)


Rate this content
Log in