जादू🌹
जादू🌹
1 min
217
जादूगर असतो कोण
हाताची कला करून दाखवतो।
बटाट्याला सफरचंद
पाण्याला दूध बनवतो।
रंगीत रंगीत तुकडे घेऊन
त्याचा बनवतो रुमाल।
मुलगी अचानक गायब करतो
खरच त्याची किती कमाल।
रिकाम्या हातात आणतो
अचानक गुलाबफुल।
मुले वाजवतात टाळ्या
पाडतो मुलांना भूल।
