विवाह
विवाह
1 min
140
आज विवाह
लाडक्या परीचा।
मंडप सगळा
सुंदर हिरवळीचा।
सगे सोयरे सगळे
झाले गोळा।
आज होता मुलीचा
विवाह सोहळा।
आई बिचारी घालत
होती तुळशीला पाणी।
बाबा तिचा आठवत होता
लहानपणीच्या आठवणी।
वेळ आली पाठवणीची
आईने फोडला हंबरडा।
वडीलही मुलीला जवळ
घेऊन आवरत होते हुंदका।
अशी लाडक्या परीची
केली आईबाबानी पाठवणी।
विवाह होऊन जातात सासरी
मागे ठेवतात फक्त आठवणी।
