नऊ दिवसांची नऊ रूपे
नऊ दिवसांची नऊ रूपे
नवरात्रात नऊ दिवसाची नऊ रूपे आपल्याला बघायला मिळतात माझ्या मते ती अशी
स्त्रीशक्ती
पहिली माळ वंदन मातृशक्तीला
तळहाताच्या फोडासारखे जपते आपल्याला।
तळहाताचा करूनी पाळणा
घराच्या सुखासाठी उभे कष्ट करण्याला।।
दुसरी माळ वंदन आजीबाईला
दुधावरची साय म्हणून जपते,
माया, ममता,प्रेम सगळं
ती निस्वार्थपणे करते।।
तिसरी माळ वंदन मावशीला
आईची बहीण म्हणता हो तिला
मायेची पाखरण ती नेहमी
असते सोबतीला ।।
चौथी माळ वंदन आत्याला
करते लाड कधी रागावते,
लहानपणी कडेवर घेऊन फिरते
वडील रागवल्यावर ती पाठीशी घालते। ।।
पाचवी माळ बहिणीला वंदन
सुख दुःख वाटून घेते
चुकले काहीतरी समजून सांगते
लहान असो व मोठी ती सगळ्यांना प्रिय असते।।
सहावी माळ ननंदेची
सासरच्या घरी मिळालेल्या नवीन मैत्रिणीची ।
नवीन घरात माया करते बहिणीची।।
सातवी माळ आहोच्या मातृदेवतेची (सासूची)
नवीन रीतिरिवाज सुनेला शिकवती।
सुनेला अंगवळणी पडेपर्यंत सांभाळून घेती।।
आठवी माळ जिवलग सखीची
जीवाला जीव देणाऱ्या मैत्रिणीची
स्वतः दुःखात असली तरी
आनंदाने सुखात आपल्या सामील होणारी।
नववी माळ वंदन लेकीला
आई बाबाला जीव लावणाऱ्या चिमणीला।
चिव चिव करून घर डोक्यावर घेणाऱ्या समजूतदार परीला।।
दहावे वंदन कामवाली बाईला
बायकांच्या त्या उजव्या हाताला
थकलात का तुम्ही असे मायेने विचारतात त्या दसऱ्याला ||
