STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

बालमन

बालमन

1 min
397

आपण झालो मोठे आता

आपले मन आईने जपले

आईबाबांच्या स्मरणी

मन ,अंतर सदोदीत रमले....


आजची आई अहो

नोकरीला घराबाहेर जाते

बालकांना एकटेच ठेवते

पाळणाघराचा आधार घेते....


पाळणाघराची ती शिस्त

मुलांना जपायलाच लागते

खाणे,पिणे,खेळणे शिस्तीत

मुलं मन मारून जगते....


नाजूक कोवळे हे बालमन

सर्व बंदिस्त या बालकांचे

मनासारखे जगणे नाही

लक्ष असून दुर्लक्ष पालकांचे.....


पूर्वीसारखे एकत्र कुटुंब नाही

आजी आजोबा घरात नाही

बालसंस्कार कथा नाहीत

अजाण अशी बालके सर्वकाही.....


खोडकरपणा अंगी बालकांच्या

मायेने ,प्रेमाने सर्वांशी वागतात

अती खेळकरपणा अंगी असतो

सवंगड्यांसह मैदानी रमतात.....


जपूया बालमने ही कोवळी

एकत्र कुटुंबात मुलांना वाढवूया

आनंदाने घरातच वळण लावूया

बालकथा ,शौर्यकथा मनी रुजवूया.....



Rate this content
Log in