पहिली पाळी...
पहिली पाळी...
बाई बाई, आली पहिली पाळी आज गं
बाई बाई, येते मला आज लाज गं...... ॥धृ॥
या तेरा वर्षाच्या वयात
दुखू लागले पोटात
पडला लाल डाग
ओटीपोटाची होई आग..... ॥१॥
काय झाले, कसे झाले ?
कपडे माझे लाल ओले
तिकडून आली आई
म्हणाली, "तू होणार बाई"..... ॥२॥
स्त्री बनण्याची ही प्रक्रिया
न्यारी आहे निसर्गाची किमया
अशुद्ध रक्त बाहेर फेकते
नवे गर्भाशय तयार होते..... ॥३॥
पाळीचे चार-पाच दिवस
आहार घ्यावा तू सकस
लाभावी तुला थोडी शांती
झोपून तू घे जरा विश्रांती..... ॥४॥
पाळीला समजू नको तू विटाळ
हा तर बाईच्या जीवनी सुकाळ
गर्भधारणेसाठी पोट तयार होते
म्हणूनच तर बाईला पाळी येते..... ॥५॥
पाळी नाही कंटाळवाणी
पाळी तर स्त्रीत्वाची गाणी
स्त्रीने घ्यावी गगनी भरारी
स्त्रीचा आहे बाणा करारी..... ॥६॥