STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

वाढदिवस

वाढदिवस

1 min
227

वाढदिवस आज तुझा

तुला काय देऊ मी शुभेच्छा।

घरातल्या सगळ्यांनी आनंदी

रहाव नेहमी असते तुझी इच्छा।


आज खरं सांगतो तुला

नेहमी मला समजून घेते।

वाढदिवस तुझा असला तरी,

घरात तू दिवसभर राबत राहते।


स्वप्न माझे खरे करण्या

नेहमी काटकसर तुझी।

मुलाबाळांना सांभाळते

कसरत तुझी तारेवरची।


संकटात नेहमी साथ देते

मदतीचा हात तू देते।

आपल्या पिलांना उंच भरारी

घेण्याचं तूच नेहमी शिकवते।


वाढदिवसाच काय देऊ आज

सुचत नाही काही मला।

शब्दरूपी भावनांचा गुंफला गजरा

बक्षिस देतो आज मी तुला।


Rate this content
Log in