योगदान
योगदान
लहानपणी आई बरोबर
आलो जेव्हा शाळेत
वाटले तेव्हा गुंफलो
आता दुःखाच्या माळेत।
सोडून जाता आई
दुसरी आई बनलात बाई
इवल्याशा गालावरचे अश्रू
पुसून दिले तुम्ही दिव्यचक्षू।
वळणदार अक्षरांची वाट
दाखवून लावले सन्मार्गाला
संस्कारांचा वारसा जपण्याची
ओळख दिली आम्हाला।
आयुष्यातील यशाची
चढताना पायरी
करतो आठवण
नेहमी आईबाबांची।
अश्या वेळी आठवण
असावी मिळवलेल्या ज्ञानाची
ज्ञान मंदिरात ओतलेल्या
शिक्षकाच्या योगदानाची।
शिक्षक असतो शिक्षणाचा आरसा
विदयार्थ्यांसाठी उचली
अखंड विद्येचा वसा
शिक्षक घडवी विद्यार्थ्याचे भविष्य
सफल होईल विदयार्थ्यांचे आयुष्य।
