गुरुदक्षिणा...
गुरुदक्षिणा...
दिली शिक्षा तिने निःस्वार्थ,
संस्काराचे सांगितले अर्थ,
दिवसरात्र ती माझ्यासोबतच जागली,
ओल्या मातीला आकार दिला तिने ,
तापून सुलाखून परिपक्व केले मने ...
पेरलेल्या संस्काराचे,
हेच आहे ऋण ,
गुरुदक्षिणा देऊ कशी ,
कितीही दिलं तरी फिटणार नाही पांग,
आई तुझ्या सारखा गुरू या जगात नाही,
विषाचे घोट पिले तरी ,
अमृतच देशील तु दुनियेला सांग ...
जीवनात आले गुरु कित्येक पण,''’’
आई तुझ्यासारखा गुरु होणे शक्य नाही ...
उदार मन तुझ्यासारख आई ,
तुझी गुरुदक्षिणा कुणीही देणार नाही ...
