STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

4  

Ramkrishna Nagargoje

Others

आनंदाचे ठिकाण

आनंदाचे ठिकाण

1 min
547

दारातला मोगरा, 

फुलतो फुलतो,

अंगी त्याच्या,सुगंध,

कोणी भरला ?


दारातला मोगरा, 

फुलतो फुलतो,

फांदी फांदी त्याची,

फुलांनी भरली.

कोणासाठी आली,

फुले सारी ?


दारातला मोगरा, 

फुलतो फुलतो,

दारातली रांगोळी,

हसते, हसते ,

काढल्या रेषा,

सरळ बाकाच्या,

तरी का प्रसन्नं दिसतसे ?


दारातला मोगरा, 

फुलतो फुलतो,

पाळण्याची दोरी,

हलवते आई,

हसते हसते,

बाळ तान्हे,

त्यांच्या अंगी हस्य,

आले कसे,?


आनंदाचे ठिकाण,

शोधू शोधू दमला,

आनंदाचे ठिकाण,

कर्म त्याचे बीजं,

का बाहेर धुंढीतसे ?


Rate this content
Log in