STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Others

3  

Sakharam Aachrekar

Others

जगण्याची किंमत

जगण्याची किंमत

1 min
97

प्रकाशात विज्ञानाच्या जेव्हा, दाटला अंधार विषाणूचा

झाला जागर त्यासमवेत, मानवाच्या सहिष्णुतेचा


होती चहूकडे विखुरली, पाखरे एका घरातली

थांबवून सार्‍यांना तू, बंधने मायेची घातली


संवाद नात्यातला होता, कोठेतरी कोंडलेला

आपलेपणा आपल्याला, तुझ्यामुळेच दरवळला


देव शोधिला, आजवर आम्ही, पाषाणात देवळाच्या

भेटावलास तोचि आजि, हृदयात माणसाच्या


धर्मांधतेचा आजवर होता, बांध घातलेला

पाश माणुसकीचा पुन्हा तूच दाखविला


होतील यापुढेही अनेक, आवर्तने दुःखाची

तूच शिकविलीस रे कोरोना, किंमत खरी जगण्याची 


Rate this content
Log in