पोलिसदादा
पोलिसदादा
ऊन ,वारा, पाऊस सगळे ऋतू
तुम्हाला सारखेच असतात।
सनावाराच्या सुट्टया देखील
तुम्हाला नसतात।
देशाच्या रक्षणासाठी कायम उभे
असतात तुम्ही।
घर,दार सोडून एकटे रहायला
शिकतात तुम्ही।
कधी दंगली, कधी रागात झालेली
छोटी मोठी भांडण ।
मोर्चा, कधी चोर मवाली साऱ्यांना तुम्हाला कस जमत डोक लावण।
कोरोना भयंकर महामारीत सुद्धा
तुम्ही जीवाची पर्वा नाही केली।
म्हणूनच सर्वांनी तुम्हाला
कोरोनयोद्धा पदवी बहाल झाली।
घरात बायको,मुले तुमची
बसतात वाट बघत।
कधी आले घरी तर फोन येतो
चार तासांनी निघायचे असते परत
तुम्ही देशाचे रक्षण करत असतात
घरच काम बघतात मुले, गृहिणी।
घरातल्या सर्व अडचणीवर मात
करत असतात घरची मंडळी।
देशाच्या रक्षणाची घेतलेली
असते तुम्ही शपथ।
जनतेच्या कोणत्याही अडचणीत
कायम उभे असते तुमचे पथक।
