STORYMIRROR

Kishor Zote

Others

2  

Kishor Zote

Others

माझी ताई

माझी ताई

1 min
5

खोडया माझ्या काढी

वेण्या माझ्या ओढी

डाव अर्ध्यात मोडी

अशी माझी ताई...


चूक जरी तीची

नाव माझेच घेई

वर वाकुल्या दावी

अशी माझी ताई...


वट घरात तिची

ऐकती बाबाही

मग मला चिडवी

अशी ताई माझी...


असे बाहेरचे कोणी 

कधी मला नडली

सदा तीच पुढे होई

अशी ताई माझी...


जर लागले खेळता

अन् पडले आजारी

वाहे माझी काळजी

अशी ताई माझी...



साहित्याला गुण द्या
लॉग इन