बाबांच प्रेम
बाबांच प्रेम
1 min
191
आईसारख बाबा तुला
प्रेम करणं जमलच नाही।
डोळ्यातल्या आसवांना
तू बाहेर कधी आणलंच नाही।
दुरूनच माझा मुड पाहून
सगळे माझ्या मनातले कळते।
सांगत नसला जरी तू मला
डोळ्यात मला तुझ्या दिसते।
आई रडून प्रेम व्यक्त करते तरी
तू मात्र नेहमीच शांत असतो।
माझा बाबा मलाच कळतो तो
आईपेक्षा हळवा असतो।
कठोर वागतो कधी तू
मला वळण लागण्यासाठी।
पद्धत तुझी वेगळीच बाबा
प्रेम व्यक्त करण्याची लाडक्या परीसाठी।
तू रागावतो, चिडतो,
प्रेमही माझ्यावर तेवढेच करतो।
म्हणून माझा बाबा मला,
खरा अभिनेता म्हणून आवडतो।
