अनोळखी ती
अनोळखी ती
1 min
174
शब्द शब्दांना कवेत घेऊन
कोऱ्या पानावर शाईने उमटते।
भाव मनातले सारे अचानक
साऱ्यांना सांगत सुटते।
एकाच शब्दाचा अर्थ
कधी कोण घेतो कसा।
वाचणाऱ्याच्या मनावर
त्याने घेतला जसा।
लिहिताना मज ती,
बऱ्याचदा अनोळखी भासते।
कविता माझीच ती मग सर्वांना
ओळख माझी सांगून जाते।
