माझ्या कल्पनेतली कविता...
माझ्या कल्पनेतली कविता...
जेव्हा माझी कविता वाचून ती कुठेतरी हरवते
अन कल्पनेतली कविता माझी वास्तवात उतरते
एकटाच मी श्वासात माझ्या, तिच्या आठवणींची माळ गुंफतो
तिच्या कोमल हातांनी स्पर्शिलेल्या फुलांची, रंगीत बाग शिंपतो
कधीतरी तिच्या प्रेमाचे वलय, माझ्या स्वप्नी अवतरते
अन कल्पनेतली कविता माझी वास्तवात उतरते
ती नसताना कधी मी, तिच्या स्वप्नांच्या रात्रीत विसावतो
तिच्या विरहात असतानाही मग क्षणभर सुखावतो
मन तिचेही केव्हातरी, माझ्या प्रतिशोधासाठी वेडावते
अन कल्पनेतली कविता माझी वास्तवात उतरते
माझ्या एक एक वाक्यामुळे, ती माझ्याशी झगडते
तिच्या गैरसमजातून नात्यांची, नवी कळी उमलते
माझ्या कवितेचे उत्तर देण्यास, ती स्वतः कविता लिहिते
अन कल्पनेतली कविता माझी वास्तवात उतरते
