प्रेम तुझं माझं
प्रेम तुझं माझं
प्रेम हे तुझं माझं गुलाबाच्या पाकळीगत फुलू लागलं होतं ,
प्रेम म्हणजे तरी काय याचा अर्थ आता शोधू पाहत होतं ।।
प्रेम तुझं माझं कधीच मोजता न येण्यासारखं होतं,
कारण, अजरामर होऊन ते देवाकडे साठवल्या गेलं होतं ।।
प्रेम मी माझं तुझ्यावरचं कधीच व्यक्त करू शकणार नाही,
कारण, तुझ्यापेक्षा प्रिय मला कधीच काही दिसत नाही ।।
तुझ्या आठवणीत राहून, दिवस जगणं मला आवडू लागलं होतं,
कारण, माझं हे फक्त प्रेम नसून आयुष्य तुझ्यापरी होतं ।।
येतील संकटे कितीही तरी, तूझा आधार मला पुरेसा असेल,
तुझ्या सोबत राहून, प्रत्येक क्षण जगण्याइतपत दुसरं सुख माझं कोणतंच नसेल ।।
