STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

विवाह🌹

विवाह🌹

1 min
239


विवाह बंधन सोहळा

म्हणजे एक अनमोल ठेवा।

एकमेकांच्या मनात एवढच

की, नेहमी सुखी संसार हवा।


सुख दुःखात नेहमी

एकमेकांना देऊ साथ।

सप्तपदी चालतांना दोघे

लक्षात ठेऊ वचने सात।


विश्वास कायम ठेऊ

समजूतदारपणा थोडा।

कितीही संकटे आली तरी

ओढत राहू संसाराचा गाडा।


एकमेकांचा करत राहू

नेहमी मान सन्मान।

तरच उभी राहील आपल्या घराला

सुखी संसाराची कमान।



Rate this content
Log in