Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vrushali Khadye

Others

4.9  

Vrushali Khadye

Others

चांदण्यांचा दिवा

चांदण्यांचा दिवा

1 min
1.0K


आकाशात पेटले चांदण्याचे दिवे

नभी लुकलुकणारे जणू काजवे....धृ


एक दिवा sss एक दिवाss

एक दिवा,अंधा-या झोपडीत गेला

झोपडीतला अंधार दूर केला.........1


एक दिवा sss एक दिवा ss

एक दिवा,परीच्या राज्यात गेला

परीची जादू शिकून आला...........2


एक दिवा sss एक दिवा ss

एक दिवा,आमच्या शाळेत आला

अभ्यास करा सांगू लागला.........3


एक दिवा sss एक दिवा ss

एक दिवा,हिरव्या बागेत गेला

फुलपाखरू पकडू लागला..........4


एक दिवा sss एक दिवा ss

एक दिवा,खेळाच्या मैदानात गेला

कबड्डी,फुटबॉल खेळू लागला......5


एक दिवाsss एक दिवा ss

एक दिवा,सिनेमागृहात गेला

ढुशुम ढुशुम करू लागला..........6


एक दिवा sss एक दिवा ss

एक दिवा,जंबो सर्कशीत गेला

विदूषकासारखा हसवू लागला......7


एक दिवाsss एक दिवाss

एक दिवा,गाण्याच्या मैफली गेला

सा रे ग म प ध नी गाऊ लागला.....8


एक दिवाsss एक दिवा ss

एक दिवा,रेल्वेगाडीत बसला

पळती झाडे,डोंगर पाहू लागला.........9


एक दिवाsss एक दिवाss

एक दिवा,माझ्या अंगणी आला

माझ्यासवे तो खेळू लागला..........10



Rate this content
Log in