पुस्तके
पुस्तके
1 min
230
आम्ही देतो सगळ्यांना
पुस्तकातून ज्ञान।
आणि बनवतो
सगळ्यांना विद्वान।
विचार करून लेखक
पुस्तकात करतो मांडणी।
वाचता ,वाचता प्रत्येक शब्दांचा
अर्थ वेगळा ,वेगळीच कहाणी।
लिहिणारा लिहीत असतो
मन लावून प्रत्येक ओळ।
वाचणारा मात्र अर्थ काढतो
वेगळा कधी शब्दांचा होतो घोळ।
