STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

पैसा, पैसा

पैसा, पैसा

1 min
140

गरीबाजवळ असतो पैसा थोडा

 वापर असतो त्याचा जपून।

स्वयंपाक पाणी असते मोजके

करतात मोजून मापून।


श्रीमंतांची चाललेली 

असते वाया श्रीमंती।

भराभर करायचं आणि फेकायच

ते याला मोठेपणा समजती।


साध्या चपला साधे कपडे

घालून निघतात पडतात बाहेर।

घामाच्या धारा उन्हात काम

नसतो कधी विसाव्याचा आहेर।


नामांकीत बूट, नामांकीत कपडे

चार चाकी थाट असतो मोठा।

खिशात असतात नेहमी यांच्या

दोन हजारांच्या नोटा।


सर्वसामान्य लोकांची तर,

वेगळीच असते फजिती।

हे धड ना श्रीमंत धड ना गरीब

यांची तर कमालच वेगळी।


Rate this content
Log in