प्रेम आईच
प्रेम आईच
1 min
126
खरच ग आई किती
प्रेम करते माझ्यावर।
काटा जरी टोचला मला
पाणी तुझ्या डोळ्याच्या काठावर।
ताप जर आला मला तर तू
उशाशी रात्र जागून काढते।
किती आई माझी प्रेमळ
मलाच मग ते कळायला लागते।
जीव माझ्यात तुझा
असतो खूप गुंतलेला।
तळहाताच्या फोडासारखा
असतो मला तू जीव लावलेला।
तुझ्यासारखं प्रेमळ आई
या जगात कुणीच नाही।
स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारीच राही।
