व्यसनमुक्ती (अभंग)
व्यसनमुक्ती (अभंग)
1 min
3.3K
व्यसनाची वाट। नका लागू नादी ।।
होते बरबादी । आयुष्याची ।।
तंबाखूचा विडा । नका आता मळू ।।
कॅन्सरचा गळू। गळा येई ।।
माव्याची सुपारी । तोंडाले रंगवी ।।
बत्तीशी दाखवी । काळीकुट्ट ।।
आतड्यास भोके । दारूची ती नशा ।।
मोह हवा कशा । दारूचाची ।।
सुपारी गुटखा । विषारी सगळे ।।
तोंडाचे वाटोळे । कशापायी ।।
सिगारेट गांजा । धुराचा तो लोट ।।
फुफ्फुसांची वाट । लावितसे ।।
नका पिऊ दारू । जीवन सुधारू ।।
आनंदाचा वारू । चोहीकडे ।।
सोडा धूम्रपान । देह ठेवा छान ।।
जगुया जीवन । आनंदाने ।।