शिक्षक
शिक्षक
शाळेत आले होते तेंव्हा
कोरी पाटी घेऊन आले होते।
हातही वळत नव्हता माझा
स्वर व्यंजन मला माहीत नव्हते।
हाताला धरून गिरवल मग,
कोऱ्या पानावर मोती झाले गोळा।
अक्षर त्यास सुंदर म्हणाले तुम्ही,
लिहिण्याचा लाविला मज लळा।
शब्द नी शब्द गोळा करून
वाक्य मी तयार करू लागले ।
चुकले काही तर रागावून कधी
प्रेमळ शब्दाने समजावून सांगितले
अज्ञान होतो आम्ही सगळे
तुम्ही दिले ज्ञानाचे भांडार।
गरुडझेप घ्यायची शिकवली
उडण्याचे बळ भरले आमच्या पंखात।
धन्यवाद गुरुजी तुमचे
आम्हास गुरु असे लाभले।
ज्यांनी आम्हास शिकवले
माणसाने, माणसाशी माणसासम
वागणे।
