गुरुजी
गुरुजी
1 min
366
मला आजही आठवतायत
दोन चष्मे बाळगणारे
साठे सर
एक दूरचं
आणि एक जवळचं पाहण्यासाठी
लिखाणाचं काम करायचे
दोन्ही हाताने
एक हात की
दुसरा हात सज्ज असायचा
सुंदर अक्षर लिहण्यासाठी
कधी विनोदी
कधी व्हायचे गंभीर
ते गंभीर झाले की
आमचा सुटायचा धीर
वरून होते कणखर
आतून होते मऊ
येते सरांची आठवण
कसा विसरून जाऊ
