कळत नकळत
कळत नकळत
1 min
373
कवितेच्या राज्यात
श्वास घेवू लागले
कवितेतून मस्त
रमणमाण झाले....
कळत नकळत
शब्दबागेत हिंडले
आपसुकच शब्द
मनामधे ठसले....
केली चारोळी छान
मिळू लागला मान
मराठीचे शिलेदार
सर्वच आहेत महान.....
शब्दांचा पसारा
खूपच वाढलाय
आता या शब्दातच
जीव फार रमलाय.....
जाईन उंचावरी
कवितेच्या वेलूवरी
स्वप्नवत भासतेय सारे
या नील ,नील अंबरी...
