स्वप्न
स्वप्न
शेतकरी बाप माझा
स्वप्न होते त्याचे।
मला वैद्य बनवायचे
खूप मोठं होताना बघायचे।
पोटाला चिमटा घेऊन त्याने
शहरात विद्यालयात टाकले।
चांगले वसतिगृह पाहून त्यात
शिकायला मला ठेवले।
कष्ट करून शेतात रोज
आई बाबा पैसे पाठवायची।
मलापण आता त्यांची स्वप्न
जिद्दीने होती पुरी करायची।
बाबा वसतिगृहात यायचा तेंव्हा
पोशाख धोतर, शिवलेल्या चपला।
मित्र विचारायचे माझे, कोण आहे
आभिमानान सांगतो बाप मपला।
परिस्थितीच भान मलाही होत
पाऊल वाकड पडल नाही।
त्यांच्या कष्टाचे चीज करायचे
एवढंच स्वप्न सारखे मनात राही।
हुशार होतो मीपण मला
मार्गदर्शन चांगले लाभले।
पहिल्या श्रेणीतच सगळे वर्ष
माझे अभ्यास करून मी काढले।
बाप माझा रोज सांगत होता
मुलगा माझा वैद्य झाला।
धोतराणे डोळे पुसत होता
आनंदाश्रू त्याच्या दिसे डोळा।
सत्कार होता माझा विद्यालयात
आईवडिलांना मी बोलावलं।
त्यांच्याच हातात बक्षीस द्यायचं
अस मी मनोमन ठरवलं।
बोलतांना सांगितलं मी ,त्यांनी
स्वप्न पूर्ण करण्या कष्ट केले अपार
शेतकरी आई बाप माझे त्यांनी
कधीच घेतली नाही माघार।
आनंदाने वाजत होत्या टाळ्या
स्वप्न त्यांच मी साकार केले।
आई वडील माझे त्यांच्या रुपात
विठ्ठल रुखुमाई आज मी पाहीले।
