प्रवास आजोबा आजीचा
प्रवास आजोबा आजीचा
1 min
134
सगळ्यासाठी जगून झालं
आता आपल्यासाठी जगू।
आयुष्याच्या पुढच्या प्रवासात
एकमेकांना मदतीचा हात मागू।
एक गोळी ,एक पोळी
हेच आपले जेवण।
माझी काठी, तुझा चष्मा
एकमेकांना देऊ आठवण।
आयुष्याचा प्रवास सुरु करतांना
सगळे सोबत होते आपल्या।
जे ते संसारात गुंतले आता
करायची त्यांची खंत कशाला।
आला दिवस काढायचा
एकमेकांना जीव लावायचा।
आतापर्यंत सुखरूप झाला प्रवास
पुढचा विधात्यावर सोपवायचा।
