अनोळखी मैत्री
अनोळखी मैत्री
1 min
197
कधी कधी रक्ताच्या
नात्यापेक्षा जास्त।
अनोळखी मैत्रीचं नातं
मला जवळच वाटत मस्त।
सांगते मनातले सगळे
मोकळे करते माझे मन।
सुख दुःखात सामील माझ्या
करत असता माझं सांत्वन।
दुःख त्यांचेही सांगतात
देते त्यांना शब्दांचा आधार।
व्यक्त करतात भावना त्यांच्या
मानतात आभार ऐकून सुविचार।
अशा अनोळखी मैत्रीचे
किती सुंदर हे नाते।
जसे वाऱ्यावर डोलणारे
नाजूक गवताचे पाते।
