सर्वसामान्य माणूस🙏
सर्वसामान्य माणूस🙏
1 min
197
मेहनत करून मी
पोटाला पोटभर खातो।
जे काम मिळेल ते आनंदाने करतो ।
लेकरे बाळे माझी असतात
आहे जे, त्यातच समाधानी
समजूतदारपणे वागतात
आहे खूप हुशार शहाणी।
घरातली लक्ष्मी माझी आहे
सुगरण गृहिणी ।
नाही करत कधी कोणताच हट्ट
सगळे काम हसतमुखानी।
महिन्याचा खर्च सगळा
असतो ठरलेला।
व्यवस्थापन करण्या खर्चाचे
पत्नी असती माझ्या सोबतीला।
दिवसभर दमून भागून
झोप लागते सुखाची।
अर्धी-एक, भाकरी खातो मी
माझ्याच दिवसभराच्या कष्टाची।
