प्राणी ओळख बालगीत
प्राणी ओळख बालगीत
1 min
310
शैक्षणिक गीत
(प्राणी ओळख गीतातून)
एक छोटे झुरळ
झोपाळ्यावर चढले
झोपाळा घेवून मग
खूप खूप दमले...,
एक छोटा उंदीर
तबल्याभोवती फिरला
तबल्याच्या आवाजाने
खूप खूप घाबरला....
अनेक लाल लाल मुंग्या
साखर शोधून दमल्या
डबा सापडताच बाई
साखरेवर ताव मारू लागल्या...
एक छोटासा बाई डास
गुंगगुंग करत हातावर बसला
मनीने तो पाहताच मग
एका फटक्यात त्याला मारला...
