जादू सुरांची
जादू सुरांची
खेड्यामध्ये सकाळीच
कोंबड्याची बाग।
लवकर जागे होतात
अन उठतात आपोआप।
पक्षी होतात सगळी गोळा
चिव चिव चिमण्यांचा किलबिलाट
वासरांसाठी हंबरणारी गाय
किती प्रेमळ मायेचा थाट।
आईच्या जात्याच्या गाण्याचा
वेगळाच असतो सूर।
गव्हाचे पीठ होत असतांना
ओव्यांची गाणे गात हरवते ती दूर
चिमणी,पोपट त्यात कावळ्याच्या
कर्कश असतो मोठा आवाज।
शाळेत प्रार्थना चाललेली असते
सुंदर दिवसाची सुरुवात।
स्वयंपाक करतांना आईच्या
बांगडीचा खुळ खुळआवाज ।
विहिरीचे पाणी भरताना चाकाचा
कुयी कुयी तो नाजूक आवाज।
कुत्र्यांचे भुंकने अन
म्याव म्याव मांजराची ।
गाईच्या दुधाची धारेचा आवाज
दूध पिण्यासाठी कुरकुर लेकरांची
खेड्यातच दिसते ही
जादूगिरी सुरांची।
प्रसन्न वातावरणात राहतात
माया, ममता, भाषा कळते प्राण्यांची।
