गुरुदेव
गुरुदेव
1 min
259
तुम्हीचं दाविली वाट आम्हाला
उंच शिखरावर चढण्याची
जीवनातील अडचणीशी
प्राणपणाने लढण्याची
तुम्हीच होता पाठीमागे
मार्ग दावण्या सदोदित
तुम्हीचं आमच्या आयुष्यात
लाविलात नंदादीपं
तुम्हीचं शिकवले पानोपाणी
इतिहासाचे कठीण धडे
तुम्हीचं शिकवले आम्हा गुरुजी
कसे भरावे ज्ञानघडे
तुम्हीचं सांगण्या होते तेथे
मार्गातील वेचन्या खडे
तुम्ही फिरविला हात पाठीवर
आशीर्वाद हीं दिला मला
लेखणीला हीं धार असते
हा मंत्रही मजला तुम्ही दिला
